July 11, 2024
गोदरेज कंपनीला काळ्या यादीत टाका; विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी, पण कारण काय?
कोरोना काळात केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत युनिव्हर्स इम्यूनायजेशन प्रोग्राम अंतर्गत राज्य शासनाला पुरवठा करण्यात आलेले गोदरेज मोठे आयएलआर १०१ युनिट्स आणि लहान आयएलआर ५७६ युनिट निकृष्ट दर्जाचे आहेत. सर्व रेफ्रिजरेटर बोगस निघाले त्यामध्ये औषधं ठेवता येत नाही तरीही पुन्हा सरकारने गोदरेज कंपनीकडूनच युनिट खरेदी करण्याचा अट्टाहास केला. गोदरेज कंपनीला काळ्या यादीत टाकून जे रफ्रिजेरेटर घेतेले ते बदलून द्या आणि एकाच कंपनीला निविदा देण्याऐवजी खुली निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.